पावसाच्या-कविता | पाऊस गाणे | paus kavita in marathi | पाऊस मराठी कविता संग्रह
पावसाच्या-कविता
पाऊस गाणे
|
पाऊस आला, पाऊस आला
आला संगे वारा
पाऊस येता भारूनी जाई
आसमंतही सारा
गडगड करूनी मेघ सावळा
नाद अंबरी भरतो
सौदामिनीचा प्रकाश पसरूनी
अवनीवरती येतो
नाद अंबरी भरतो
सौदामिनीचा प्रकाश पसरूनी
अवनीवरती येतो
पाऊस येता हर्ष होऊनी
रिमझिम गाणे गातो
स्वैर होऊनी मयूर कसा हा
नृत्य काननी करतो
रिमझिम गाणे गातो
स्वैर होऊनी मयूर कसा हा
नृत्य काननी करतो
तरू-वेलींवर कळय़ा फुलेही
डुलती आनंदात
भिजता-भिजता वा-यासंगे
पाऊस गाणे गात
डुलती आनंदात
भिजता-भिजता वा-यासंगे
पाऊस गाणे गात
पाऊस येता भिजलेल्या
मातीचा पसरे गंध
सुचते मजला नकळत तेव्हा
गीत असे स्वच्छंद
मातीचा पसरे गंध
सुचते मजला नकळत तेव्हा
गीत असे स्वच्छंद
अमेय गुप्ते, दादर
==================================================================================================================================
पहिला पाऊस
तप्त मातीला आणि मनाला
गारवा देणारा पहिला पाऊस
ओसाड भकास सृष्टीला
हिरवा करणारा पहिला पाऊस
अल्लड मुलांना अन् साऱ्यांनाच
चिंब करणारा पहिला पाऊस
गारवा देणारा पहिला पाऊस
ओसाड भकास सृष्टीला
हिरवा करणारा पहिला पाऊस
अल्लड मुलांना अन् साऱ्यांनाच
चिंब करणारा पहिला पाऊस
पण मला अजूनही आठवतोय पहिला पाऊस
माझ्या पेंढारी घरातून आत
थप-थप गळणारा..
सतरा ठिगळांच्या कुडातून आत
झिर-झिर झिरपणारा..
जिथं गळायचं तिथं भांडं असायचं
तरीही घराची चाळण करणारा
पहिला पाऊस..
माझ्या पेंढारी घरातून आत
थप-थप गळणारा..
सतरा ठिगळांच्या कुडातून आत
झिर-झिर झिरपणारा..
जिथं गळायचं तिथं भांडं असायचं
तरीही घराची चाळण करणारा
पहिला पाऊस..
पोरं रस्त्यावर थिरकायची पावसात
आम्ही मात्र भिजायचो घरच्या घरात
तुडुंब शेत, पाणी भरायचं नदी-नाल्यात
आमचे टोप भरायचे-भरायची पिठाची परात
छत्री कुठली? गोणपाटाचं खोलडं
कपडे भिजायचे, काहीच नसायचं कोरडं
रपा-रपा मातीत पाय
फटीतून बोटांच्या चिखल यायचा वरती
तरीही धुंद सारे-तृप्त व्हायची धरती
आम्ही मात्र भिजायचो घरच्या घरात
तुडुंब शेत, पाणी भरायचं नदी-नाल्यात
आमचे टोप भरायचे-भरायची पिठाची परात
छत्री कुठली? गोणपाटाचं खोलडं
कपडे भिजायचे, काहीच नसायचं कोरडं
रपा-रपा मातीत पाय
फटीतून बोटांच्या चिखल यायचा वरती
तरीही धुंद सारे-तृप्त व्हायची धरती
गंगाधर साळवी, महाड
=================================================================
आवडता पाऊस
मनाला हुरहुर लावून देणारा तो पाऊस..
कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस..
हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस..
लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा तो पाऊस!!
कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस..
हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस..
लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाला आवडणारा तो पाऊस!!
कधी धो-धो तर कधी रिमझिम पडणारा तो पाऊस..
स्वप्नांच्या गावात घेऊन जाणारा तो पाऊस..
तुझ्या माझ्या आठवणीत रमणारा तो पाऊस..
चिंब-चिंब भिजवून हरवून टाकणारा तो पाऊस!!
स्वप्नांच्या गावात घेऊन जाणारा तो पाऊस..
तुझ्या माझ्या आठवणीत रमणारा तो पाऊस..
चिंब-चिंब भिजवून हरवून टाकणारा तो पाऊस!!
अबोल असला तरी खूप काही बोलून जाणारा तो पाऊस..
मातीला भिजवून सुगंध देऊन जाणारा तो पाऊस..
भान हरवून टाकणारा तो पाऊस..
हवा-हवासा वाटणारा तो पाऊस!!
मातीला भिजवून सुगंध देऊन जाणारा तो पाऊस..
भान हरवून टाकणारा तो पाऊस..
हवा-हवासा वाटणारा तो पाऊस!!
अपूर्वा धामणीकर, ठाणे
=================================================================
श्रावण सरी
सरीवर सरी श्रावणसरी
धरणीमातेने पांघरला
हिरवा शालू भरजरी।। धृ।।
धरणीमातेने पांघरला
हिरवा शालू भरजरी।। धृ।।
ऐका पंचमहाभुतांची किमया
पृथ्वी, आप, तेज, वायू,
आकाश लीलया
कसा योग जुळून येतो या दुनिया
श्रावण धारा बरसती धरणीवरी
श्रावण सरी, श्रावण सरी।। १।।
पृथ्वी, आप, तेज, वायू,
आकाश लीलया
कसा योग जुळून येतो या दुनिया
श्रावण धारा बरसती धरणीवरी
श्रावण सरी, श्रावण सरी।। १।।
नदी-नाले तुडुंब भरूनी वाहती
फुलपाखरू मनसोक्त बागडती
पक्षी किलबिलाट करती
मयूर पिसारा फुलवती
श्रावण धारा बरसती धरणीवरी
श्रावण सरी, श्रावण सरी।। २।।
फुलपाखरू मनसोक्त बागडती
पक्षी किलबिलाट करती
मयूर पिसारा फुलवती
श्रावण धारा बरसती धरणीवरी
श्रावण सरी, श्रावण सरी।। २।।
नानाविध फुले उमलती
ऊन-सावल्या नाच करती
इंद्रधनू नभाला तोरण बांधती
चहूकडे माणिक मोती बरसती
श्रावण धारा बरसती धरणीवरी
श्रावण सरी, श्रावण सरी।। ३।।
ऊन-सावल्या नाच करती
इंद्रधनू नभाला तोरण बांधती
चहूकडे माणिक मोती बरसती
श्रावण धारा बरसती धरणीवरी
श्रावण सरी, श्रावण सरी।। ३।।
असेच व्हावे सदा श्रावणाचे आगमन
निसर्गाच्या सान्निध्यात रोज करावे भ्रमण
मन:शांती मिळे आत्मा होई प्रसन्न
जीवन होईल शतायुषी कदापि न मरण
श्रावण धारा बरसती धरणीवरी
श्रावण सरी, श्रावण सरी।। ४।।
निसर्गाच्या सान्निध्यात रोज करावे भ्रमण
मन:शांती मिळे आत्मा होई प्रसन्न
जीवन होईल शतायुषी कदापि न मरण
श्रावण धारा बरसती धरणीवरी
श्रावण सरी, श्रावण सरी।। ४।।
डॉ. जनार्दन महिसरे, नवीन पनवेल
=================================================================