मराठी घास भरवताना चे उखाणे
कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास..........ना भरवते मी ..... चा घास.
गुलाब आणि चाफयाचा दरवळला सुवास ,
...........रावांना भरवते ................घास् .
भाद्रपद महिन्यात गणपती बसवतात शाडूचा
.................. ला देते घास लाडूचा.
लग्नासारख्या मंगळदिनी कोणी नका रागावू नि रुसू
................ ना घास भरवताना मला येते गोड हसू.
गणपति च्या देवळात धुपाचा वास
..............ला भरवतो मी लाडूचा घास.
गाण्याच्या भेंडयांचा मूड आहे खास
.................ला भरवते लाडूचा घास.
जाई-जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास
........... ला देते मी .............. चा घास
भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
.............ला घास देते पंगत बसली मित्रांची
सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास
.......... ना भरवते मी ........... चा घास.
सुखाचा होतोय इतका वर्षाव सत्य नव्हे की हा आहे हा भास
सत्यप्रचितीसाठी भरवते ..... ला .......... चा घास.
मराठी डोहाळे जेवणाचे उखाणे
सासूबाई आहेत प्रेमळ वन्स आहेत हौशी
........ चं नाव घेते डोहाळेजेवणाच्या दिवशी.
चांदीच्या भांडयांना असावा नाशिकचा घाट
....... चं नाव घेते .... च्या डोहाळेजेवणाचा थाट.
चांदीच्या वाटीत रूपये ठेवले साठ
.... चं नाव घेते केला डोहाळेजेवणाचा थाट.
रुखवंत उचलतांनाचे उखाणे -
आला आला रुखवत त्यात होती पुरी
..................विहीणीच्या नाकापेक्षा नथीचंच वजन भारी.
आला आला रुखवत त्यात होती पावती
........................नवर्याची माउली कोंबडीसंग खेळती.
आला आला रुखवत त्यावर होता आंबा,
..........................................रुखवत उघडती रंभा.
आला आला रुखवत त्यावर होता मोर,
....................................विहीन माझी चंद्राची कोर.
आला आला रुखवत, रुखवतावर दींड
..................विहीन बाईंनी दिली बघा महादेवाची पिंड.
आला आला रुखवत, त्यात होती पणती
.....................विहीन बाईंच्या पदरात पड़ो वाटीभर मोती
आला आला रुखवत, त्यात होता रवा,
विहीणबाई च्या घरी सोन्याचा तवा.
आला आला रुखवत, त्यात होता पेरू,
सोन्या सारखी मुलगी दिली विहीणबाई कसे उपकार फेडू
आला आला रुखवत, त्यात होती अंगठी
विहीणबाई चला फिरू जरा तलवा काठी
आला आला रुखवत त्यात होता पेढा
विहीणबाई चला आता जेवायला वाढा.
आला आला रुखवत, त्यात होती मटकी ,
विहीणबाईना लागते माझ्या बसल्या बसल्या डुलकी
दशरथ राजानं केला पुत्रासाठी नवस आज
........ च्या मुलाच्या बारशाचा दिवस.
नीलवर्ण आकाशात चमकतो शशी
........चं नाव घेते ..... च्या बारशाच्या दिवशी.
मावळला सूर्य उगवला शशी
........ चं नाव घेतेच्या दिवशी
आई-वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी
....... चे नाव घेते बारशाच्या दिवशी
शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी
.......... चं नाव घेते बारशाच्या दिवशी.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी
....चं नाव घेते ... च्या बारशाच्या दिवशी.
हिरवं लिंबू गारसं
... रावांच्या बाळाचं आज बारसं.
बनारसी शालूला आहेत जरतारी काठ
... च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.
नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण
......... चं नाव घेते बारशाचं कारण.
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी
....चं नाव घेते ... च्या बारशाच्या दिवशी.
........रावांच्या लग्न मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.
सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
..... ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.
एक होती चिऊ एक होती काऊ,
…… रावांच नाव घेते , डोक नका खाऊ.
चान्दिच्या ताटात फणसाचे गरे
.................राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे
वाकडी तिकडी बाभूळ, तिच्यावर बसला होला,
सखा पाटील मेला , म्हणून तुका पाटील केला.
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
........... माझी बायको आहे मोठी लुच्ची
पुणे मध्ये आमचा बंगला उभा आहे ऐटीत
जळू नका लोकहो.........राव आहेत आय. टी. त
श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
.......... ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
सुंदर सुंदर हरणाचे फेगडे फेगडे पाय
............. अजून नाही आले पिऊन पडले की काय
पुणे तेथे काही नाही उणे
.............. गावाला गेल्यावर घर होते सूनेसूने
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
……..रावांशी केले लग्न, आता आयूष्याची वाट.
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
.......... च्या जीवावर करते मी मजा
............. करतात शुध्दलेखनात भेसळ
मी त्याची तर्री ते माझी मिसळ
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, ...... चे नाव घेतो ..... रावान् चा पठ्ठा
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
....रावांचे नाव घेते वटसावित्री साठी खास
चांदीच्या वाटीत खड़ी साखर खड़े
............चं नाव घेते वटसावित्रीपुढे
हंसराज पंक्षी दिसतात हौशी
---रावाचे नव घेते वटसावित्रीच्या दिवशी
रुसलेला राधेला, कन्हैया म्हणतो हास
......चं नाव घेते वटसावित्रीसाठी खास
आई-वडिल आहेत प्रेमळ, सासू सासरे आहेत हौशी
....... चे नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी
शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी
.......... चं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी
....चं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी
शंकर-पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज
...... चं नाव घेते वटसावित्रीपुजा आहे आज
नीलवर्ण आकाशात चमकतो शशी
....चं नाव घेते वटसावित्रीच्या दिवशी
मावळला सूर्य उगवला शशी
...... चं नाव घेते वटसावित्री च्या दिवशी
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि ----
रावांचे नाव घेते वटसावित्री दिवशी
ताजमहल बांधण्यासाठी कारागीर होते कुशल
.........चं नाव घेते वटसावित्रीसाठी स्पेशल
मंगलागौरी चे उखाणे
वीज पुरवठ्या साठी कोराडीला बांधले धरण
........ चेे नाव घेते मंगलागौरी कारण
हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशि
........रावांचे नाव घेते मंगलागौरीपाशी
अत्तरदाणी,गुलाबदाणी,पान ठेवले तयारकरून
........चे नाव घेते मंगलागौरीला स्मरूण
पुजेसाठी जमवील्या नानाप्रकारच्या पत्री
........चे नाव घेते मंगलागौरीच्या राती
भिल्ली च्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा
..........चे नाव घेते सौभाग्यासाठी केली मी मंगलागौरीची पुजा
दंडात घालते वाकी , हातात घालते तोडे
.........रावांचे नाव घेते मंगलागौरी पुढे.
शुभ प्रसंगी लावतात दरवाजाला मंगल तोरण
..............रावांचे नाव घेते मंगलागौरी आहे कारण
मावळला सूर्य उगवला शशी
.............रावांचे नाव घेते मंगलागौरी च्या दिवशी
कुबेरा घरी सोन्या-चांदीच्या राशि
...............रावांचे नाव घेते मंगलागौरीपाशी
चांदी च्या ताटात खडी साखरे चे खडे
..............रावांचे नाव घेते मंगलागौरी पुढे
ताजमहल बांधण्यासाठी कारिगर होते कुशल
.............रावांचे नाव घेते मंगलागौरीसाठी स्पेशल
शब्द आणि अर्थ , कवी आणि कविता
...............रावांचे नाव घेते मंगलागौरी करिता
वृक्षाच्या छायेत, वनदेवी घेते विसावा
........चे नाव घेते मंगलागौरी तुझा आशिर्वाद असावा