Showing posts with label हस्तमैथुन. Show all posts
Showing posts with label हस्तमैथुन. Show all posts

Monday, December 28, 2015

हस्तमैथुन , संभोग , पत्नीबरोबर संभोग, पुरुषत्व

हस्तमैथुन हानीकारक नाही,असं तुम्ही पूवीर् दिलेल्या उत्तरांमध्ये मी वाचलं पण, आयुवेर्द
शास्त्र त्याला हानीकारक मानतं. या परस्परविरोधी विचारांवर थोडा प्रकाश टाकावा.

उत्तर : हस्तमैथुन हानीकारक आणि अपायकारक असल्याचा गैरसमज सर्वच पुरातन शास्त्रांनी
करून घेतला होता. विज्ञानाने मागच्या शतकात केलेल्या प्रचंड प्रगतीमुळे पूवीर्च्या काळात
प्रचलीत असलेले अनेक भ्रामक आणि अवैज्ञानिक गैरसमज आज लोप पावले आहेत. हस्तमैथुनाला
हानीकारक मानणं हाही असाच एक जुनाट आणि निराधार गैरसमज आहे. याच गोष्टीला आता
तर्क आणि विज्ञान याच्या आधारे समजून घेऊया.

स्वत:च्या पत्नीसमवेत संभोग, समागम करणं याला सामान्यत: कुठलंही शास्त्र हानीकारक किंवा
अपायकारक मानत नाही. संभोग केल्याने इंदिय लहान होतं किंवा पुरुषत्व कमी होतं असं म्हटलेलं
कुठंही ऐकिवात नाही. वेश्येबरोबर संभोग करणं अपायकारक असू शकतं. त्यामुळे नीतिमत्तेचं
अध:पतन किंवा गुप्त रोगांची लागण होऊ शकते. पण पत्नीबरोबर संभोग करण्याबाबत कुठलीच
संस्कृती आणि शास्त्र त्यापासून शारीरिक अपाय आहे असं म्हणत नाही.

संभोग करताना पुरुषाच्या इंदियामध्ये तीन गोष्टी घडतात. शिश्न ताठ होतं, ते चोळलं जातं
आणि अखेरीस वीर्यपतन घडतं. अगदी याच तीन गोष्टी हस्तमैथुन करतेवेळी शिश्नामध्ये घडतात.
संभोग आणि हस्तमैथुन या दोन्ही प्रक्रियांमध्ये शरीरामध्ये घडणाऱ्या घटना अगदी एकसारख्या
आहेत. फरक जो आहे तो शरीराबाहेरच्या घटकामध्ये आहे. संभोग करतवेळी स्त्री असते तर,
हस्तमैथुन करतेवळी स्वत:चा हात किंवा तत्सम एखादी गोष्ट असते.

शरीराबाहेरील घटक वेगवेगळे असले तरी, शरीरामधून घडणाऱ्या घटना संभोग आणि हस्तमैथुन या
दोन्ही क्रियांमध्ये अगदी एकसारख्या असतात. मग जर, संभोग अपायकारक नसेल तर हस्तमैथुन
तरी अपायकारक असण्याचं काय कारण?

ज्याप्रमाणे वाहतं पाणी स्वच्छ असतं आणि साठलेलं पाणी कालपरत्त्वे दुषीत होतं त्याप्रमाणेच,
वीर्य जितकं वाहून जाईल तितकं ते ताजं आणि शुद्ध राहातं. बाहेर पडू न दिलेले वीर्य हे शिळं
किंवा अकार्यक्षम असण्याची जास्त शक्यता असते. या माहितीवरून हे सिद्ध होतं की, हस्तमैथुन
हा एक शारीरिक आणि कुठल्याही अपायांनी विरहित असा सामान्य प्रकार आहे. त्यापासून
काहीही शारीरिक नुकसान होत नाही.