नववधूंच्या कौमार्याची (व्हर्जिनिटी टेस्ट ) परीक्षा घेण्याची रीत| सुहागरात्र
प्रत्येक समाजाचे लग्नाचे विविध रितीरिवाज असतात. परंतु गुजरातमधील छरा समाजातील
नववधूंच्या कौमार्याची (व्हर्जिनिटी) परीक्षा घेण्याची रीत जरा विचित्रच म्हणावी लागेल.
लग्नाच्या पहिल्या रात्रीच प्रत्येक नववधूला आपण कुमारिका असल्याचे सिद्ध करावे लागते. ते
सिद्ध झाले तर संसाराचा गाडा पुढे चालतो. परंतु (वधूच्या) दुर्दैवाने ते सिद्ध झाले नाही तर
तिचा संसार मोडतोच , शिवाय आयुष्यभर निंदानालस्ती सहन करावी लागते.
छरा समाजाची कौमार्याची परीक्षा घेण्याची पद्धत अगदी सोपी आहे. परंतु शास्त्रीयदृष्ट्या
ती अजिबात योग्य नाही. छरा समाजामध्ये वर आणि वधूच्या विवाहाच्या दिवशीच वधूची
कौमार्य चाचणी होते. त्यासाठी बिछान्यावर एक पांढ-या रंगाची चादर अंथरली जाते. त्या
दोघांना या पांढ-या चादरीवरच आपली पहिली रात्र साजरी करावी लागते. दुस-या दिवशी
घरातील बुजुर्ग मंडळी या पांढ-या चादरीची पाहणी करतात. पंचांसमोर ही चादर दाखविली
जाते. चादरीवर रक्ताचे लाल डाग आढळले , तर नववधू कुमारी होती , असा निष्कर्ष काढला
जातो. जी नववधू कौमार्य चाचणीत पास होते , तिचा समाजातील भाव वाढतो. तिच्या
माहेरची मंडळी हा क्षण सेलिब्रेट करतात.
परंतु दुर्दैवाने चादरीवर रक्ताचे डाग आढळले नाहीत तर नववधूच्या चारित्र्यावर संशय व्यक्त
केला जातो. कौमार्य चाचणीत नापास झालेल्या नववधूला तिचा नवरा तत्काळ घटस्फोट देऊ
शकतो. घटस्फोट दिला नाही तर तो देईल तो जाच सहन करावा लागतो. प्रसंगी सर्वांसमोर
तिला मारहाणही केली जाते. कौमार्य चाचणीत फेल ठरलेल्या नववधूच्या आईवडिलांना समाजात
तोंड दाखविणे मुश्किल होते.
लाजो आणि कुंदन ( नावे बदलली आहेत) यांचे अलिकडेच लग्न झाले. परंतु लाजो कौमार्य चाचणीत
फेल ठरली. त्यामुळे लाजो आणि कुंदन यांना कौमार्य सिद्ध करण्यासाठी आणखी नऊ दिवसांची
मुदत देण्यात आली. मात्र त्या कालावधीतही तिला आपले कौमार्य सिद्ध करता आले नाही.
परिणामी छरा समाजात लाजोची बदनामी झाली , शिवाय भर पंचायतीत तिला नव-याने
घटस्फोट दिला. परंतु लाजोच्या घरच्यांना हा निवाडा मान्य झाला नाही. त्यांनी लाजो व
कुंदनची वैद्यकीय चाचणी केली. तेव्हा लाजोचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले , तर तिच्या
नव-याच्या जननेंद्रियातच दोष असल्याचा अहवाल सेक्सोलॉजिस्टनी काढला.
हल्ली हल्ली काही लोक शिक्षणाला महत्त्व देऊ लागले आहेत. परंतु तरीही छरा समाजामध्ये
कौमार्य परीक्षेची प्रथा सुरुच आहे , अशी माहिती छरा समाजाचे नेते व वकिल मनोज तमंची
यांनी दिली.
कंजारभाट समुदाय में शादी के बाद पंचायत द्वारा दुल्हन का वर्जिनिटी टेस्ट (virginity test) कराने का एक सनसनीखेज मामला सामने आया है। शर्मनाक बात यह है कि लड़की और लड़का दोनों उच्च शिक्षित हैं। उनकी फैमिली भी पढ़ी-लिखी है। लड़का इंग्लैंड से उच्च शिक्षा लेकर इंडिया लौटा है। पंचायत 31 दिसंबर को बुलाई गई थी। इसका वीडियो सोशल मीडिया पर सामने आया है। डिप्टी चैरिटी कमिश्नर कृष्णा इंद्रेकर ने इस शर्मनाक घटना का खुलासा किया।
-ऐसा बताया जा रहा है कि पुणे के कोरेगांव पार्क में इस कपल की शादी हुई थी। इसके बाद दूल्हे ने दुल्हन का वर्जिनिटी टेस्ट कराया। पंचायत के दौरान दूल्हा-दुल्हन को अकेले कमरे में बंद कर दिया गया। जबकि बाहर पंचायत बैठी रही।
-उल्लेखनीय है कि कंजारभाट समाज में रिवाज है कि अगर दूल्हा चाहे तो दुल्हन को पंचायत के आदेश पर अपना वर्जिनिटी टेस्ट देना पड़ता है। अगर लड़की इसमें फेल हो जाती है, तो शादी टूट जाती है।
-कंजारभाट समुदाय में वर्जिनिटी टेस्ट की कुप्रथा लंबे समय से चली आ रही है। इसका विरोध भी लगातार जारी है। इस नए मामले ने विरोध को और मुखर कर दिया है।
-हैरान करने वाली बात यह है कि लड़के के पिता पुणे के पूर्व नगरसेवक रह चुके हैं। वहीं लड़की का पिता रिटायर पुलिस इंस्पेक्टर है। दूल्हे ने पंचायत के सामने लड़की के वर्जिनिटी टेस्ट की बात रखी थी।