Tuesday, March 8, 2016

इंग्रजी शिकण्यास मदत

आज इंग्रजीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले असून तिचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे.आजुबाजूस जर कोणी इंग्रजीत संभाषण करत असेल आणि आपल्याला जर जमत नसेल तर मात्र आपल्याला आपलेच हसू य़ॆते.इंग्रजी बोलण्यास शिकण्यासाठी असा काही अधिक वेळ द्यावा लागत नाही पण ती भाषा शिकण्याची आपण सुरुवातच केलेली नसते.कोणतीही गोष्ट अशक्य नाही.असे आपण फ़क्त म्हणतो.त्या विधानास प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण फ़ार कमी प्रयत्न
करतो.ही इंग्रजी भाषा एका महिण्यात आपण उत्तम शिकू.फ़क्त तुम्ही सुरुवात करा.दररोज एक तास.
मी आज तुम्हाला अशा वेबवर नेतोय ती वेब व्याकरण तर शिकवेलच याशिवाय संभाषण कसे करावे हे ही शिकवेल.उच्चार आणि वाक्य यात समन्वय असलेले संभाषण आपल्याला नक्कीच आवडेल.तुम्ही या वेबवर ब-याच भाषेत संभाषण ऐकू शकता.फ़क्त ईथे मराठी भाषा नाही.हिंदी आहे.काही हरकत नाही.सोपी हिंदी आपल्याला इंग्रजी शिकण्यास मदत करेल.मग निश्चय करा.मला एका महिण्यात इंग्रजी शिकावयाची आहे.मग ही भाषा आपलेल जगाची सैर करण्यास मदत करेल.चला त्या वेबवर जाण्यासाठी
 येथे क्लिक करा.