Tuesday, March 8, 2016

सूत्रसंचालन चारोळ्या सुत्रसंचालन कसे करावे सूत्रसंचालन कसे करावे सुत्रसंचलन

Marathi Sutrasanchalan Video Of Sangeet Programm Video download, Marathi Sutrasanchalan Video Of Sangeet Programm bollywood movie video, 3gp Marathi Sutrasanchalan Video Of Sangeet Programm video Download, Marathi Sutrasanchalan Video Of Sangeet Programm Mp4 Download, Marathi Sutrasanchalan ...

s





सूत्रसंचालन क्षेत्रात यायचंय ?

सूत्रसंचालन क्षेत्रात स्थिरावण्यासाठी कुठली कौशल्ये आत्मसात करावी लागतात, तसेच या क्षेत्रातील विविध संधींबाबतचे मार्गदर्शन-
ल्ली मुंबई व अनेक प्रमुख शहरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठय़ा प्रमाणात केले जाते. सामाजिक व राजकीय सभा, वर्धापनदिन, बक्षीस समारंभ, साहित्य सम्मेलने, नाटय़ व काव्यसम्मेलने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठय़ा प्रमाणात केले जाते.

इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी असते ती व्यासपीठप्रमुखाची. ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडता आली नाही तर संपूर्ण कार्यक्रमाचा विचका होतो आणि आयोजकाचे हसू होते. अशा मोठय़ा कार्यक्रमामध्ये व्यासपीठ प्रमुखाने आयोजकांशी चर्चा करून सर्व गोष्टींचे प्लॅिनग (नियोजन) करणे आवश्यक असते. सूत्रबद्ध व चांगल्या पद्धतीने कोणताही कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी व्यासपीठ प्रमुखाची असते.

व्यासपीठावरील आसन व्यवस्था, टेबले, दीपप्रज्वलन यांची योग्य ठिकाणी मांडणी करायला हवी. पोडियमची जागा, टेबले, माईकची व्यवस्था, पाण्याच्या बाटल्या, लिहायचे पॅड, पेन, कार्यक्रमपत्रिका इत्यादी गोष्टींची मांडणी अभ्यासपूर्वक व योग्यरत्या करणे आवश्यक असते.

स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, हारतुरे, शाली, ट्रे या वस्तू कोणत्या दिशेस ठेवाव्यात याचे ज्ञान असणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे हारतुरे, पुष्पगुच्छ घेऊन जाणाऱ्या मुलींना/ महिलांना आगाऊ योग्य सूचना देणे आवश्यक असते. अन्यथा अशा मुलींचा कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ होतो.

कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना डेकोरेटरची माणसे कोण आहेत, साऊंड व्यवस्था कोण सांभाळतो, ईश:स्तवन, अथवा पसायदान कोण गाणार आहे, फोटोग्राफर कोण आहे या सर्वाची नावे व मोबाइल नंबर ठाऊक असणे आवश्यक असते. कारण कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर बसलेले असतात.

अशा वेळी एखादा घोटाळा अथवा अचानक एखाद्याची गरज भासल्यास व्यासपीठावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन कानात कुजबुज करावी लागते आणि हे दिसणं योग्य वाटत नाही. कित्येक वेळा अशा व्यक्तींना आयत्या वेळी शोधण्यासाठी वेळ फुकट जातो.

स्टेज इनचार्ज व सूत्रसंचालक या दोघांचा ताळमेळ असणे आवश्यक  असते म्हणून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी संपूर्ण कार्यक्रमाच्या आखणीची दोघांनीही माहिती करून घेणे आवश्यक असते. ते न झाल्यामुळे एका कार्यक्रमात असाच एकदा गोंधळ उडाला होता.

त्या कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेल्या अनेक सत्कारमूर्तीचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्याचा कार्यक्रम चालू होता. त्या स्मृतिचिन्हांवर सत्कारमूर्तीची नावे लिहिली होती. परंतु ही गोष्ट सूत्रसंचालकास ठाऊक नव्हती. काही अडचणीमुळे सूत्रसंचालकाने नावे घेण्याचा क्रम बदलला त्यामुळे स्मृतिचिन्ह घेऊन जाणाऱ्या मुली व्यासपीठावर अध्र्याहून मागे फिरत होत्या.

कारण ते स्मृतिचिन्ह त्या व्यक्तीचे नसायचे. हा गोंधळ कशामुळे होतोय हे निवेदकाला कळत नव्हते. प्रेक्षकांचा गैरसमज झाला की सूत्रसंचालक चुका करतोय, परंतु प्रत्यक्षात तसे नव्हते. कोणताही कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी व्यासपीठ प्रमुखावर असते त्यासाठी आयोजकांनी कार्यक्रमापूर्वी व्यासपीठ प्रमुखाशी चर्चा करणे आवश्यक असते. तसेच त्यांच्या सूचनाही विचारात घेणे आवश्यक असते.

सूत्रसंचालन हा इव्हेंटचाच महत्त्वपूर्ण भाग आहे आणि या क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांना भविष्यात खूप मोठा वाव आहे. या क्षेत्राचे महत्त्व अधिकाधिक वाढत जाणार आहे. आजही काही मंडळी या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवून आहेत. अशोक रानडे, प्राध्यापक शंकर वैद्य, प्राध्यापक राम शेवाळकर, भाऊ मराठे, मंगला खाडिलकर, सुरेश खरे, सुधीर गाडगीळ या मंडळींनी निवेदन या क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. स्वत:चा व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे काही मंडळी वळत आहेत. तर काही जण छंद म्हणून जोपासत आहेत.

सूत्रसंचालकाचे स्थान- सूत्रसंचालक हा व्यासपीठावरच असावा. त्याला आपल्या नजरेतून शेवटच्या श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचण्याची कला अवगत असावी. काही आयोजक सूत्रसंचालकाला व्यासपीठाच्या खाली बसवितात. हे पूर्णपणे चुकीचे आहे.

कारण अशा वेळी सूत्रसंचालकाला संपूर्ण कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे जड जाते आणि मग कार्यक्रमापेक्षा श्रोत्यांच्या गप्पांना अधिक रंग चढतो.
सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमात मुख्य सूत्रसंचालक एकच असतो. काही वेळेला साहाय्यकांना निवेदन करण्याची थोडीशी जबाबदारी सोपविली जाते. उदा. पाहुण्यांचा परिचय, सत्कार समारंभ, आभारप्रदर्शन इत्यादी.

परंतु काही संस्था मुख्य सूत्रसंचालकाची जबाबदारी दोन किंवा तीन व्यक्तींकडे सोपवितात आणि मग या निवेदकांमध्ये बोलण्याची व माईक स्वत:समोर खेचण्याची स्पर्धा सुरू होते.
निवेदकाचे स्थान कोणत्या दिशेला असावे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ज्या बाजूला सत्कार समारंभाचे सामान ठेवलेले असेल अथवा कार्यक्रमाशी निगडित वस्तू ठेवलेल्या असतील त्या दिशेला असावे. कारण काही गोंधळ झाल्यास अडचण भासल्यास त्वरित निवेदकाला इशारा करता येतो अथवा सूचना देता येतात.

सूत्रसंचालकाची जबाबदारी कोणावर सोपवावी हेसुद्धा महत्त्वाचे आहे. ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे, कमावलेल्या खणखणीत आवाजाची देणगी ज्याला लाभली आहे, ज्याला या विषयाचा अभ्यास आणि सराव आहे, अशाच व्यक्तीकडे जबाबदारी सोपवावी.

कारण सूत्रसंचालक हा व्यासपीठावरील कार्यक्रम व श्रोते यांच्यातला महत्त्वाचा दुवा असतो, परंतु कित्येक वेळेला मी पदाधिकारी आहे म्हणून अथवा माझ्या विभागात माझाच हा मान अशा अटी घालणाऱ्या व्यक्ती काही वेळेला चांगल्या कार्यक्रमाचा विचका करतात.

आवश्यक अभ्यासात्मक गोष्टी- निवेदकाचा आवाज स्पष्ट व चांगला असावा. घोगरा नसावा. श्वासावर पूर्ण नियंत्रण असावे. श्वासोच्छवासाचा आवाज माईकवर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जेवढा लांब श्वास रोखून धरता येतो तेवढा आवाजाचा दर्जा चांगला. याकरिता आवाजाचा (व्हॉईस कल्चर) अभ्यास केल्यास अधिक उत्तम.

एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन करायचे असेल तर किमान चार दिवस आधी जिभेचे, घशाचे व पोटाच्या स्नायूंचे विविध व्यायाम करायला हवेत. जेणेकरून स्पष्ट शब्दोच्चार व चांगल्या आवाजाला हा सराव उपयोगी पडतो. गायकाला जसा गाण्याआधी रियाज करावा लागतो तसाच निवेदकाला आवाजाचा (घशाचा) सराव करणे आवश्यक आहे.

आवाजाच्या विकासाकरिता शास्त्रोक्त अभ्यास सर्वप्रथम इटालियन प्राध्यापक ‘स्क्विझी’ यांनी केला. त्यानंतर आपल्या येथे बी. आर. देवधर हे शास्त्र शिकून आले व त्यांच्यामार्फत हा अभ्यास डॉ. अशोक रानडे व निर्मला गोगटे यांनी केला व हळूहळू या अभ्यासाचे महत्त्व सर्वाना कळू लागले.
निवेदकाने स्पष्ट शब्दोच्चार व स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे. अवास्तव मोठय़ाने बोलणे केव्हाही वाईट, तसेच तोंडातल्या तोंडात बोलणे चुकीचे.

योग्य पट्टीतून बोलण्याचा अभ्यास असावा. तसाच कार्यक्रमाच्या प्रसंगानुरूप व भाषेनुसार चढ-उतार करणे व लय ठेवणे आवश्यक आहे. कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा अथवा द्यायचा नाही, पॉझ घेणे याचा कार्यक्रमापूर्वी संहितेचे वाचन करून सराव करणे आवश्यक आहे. आत्मविश्वासाने आणि ताणविरहित निवेदन  करता येणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव हेही तितकेच महत्त्वाचे.

मख्ख चेहऱ्याने बोलणाऱ्याचे निवेदन श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहचते पण मनापर्यंत पोहोचत नाही. जो कार्यक्रम सादर करणार आहोत, त्या कार्यक्रमासंबंधी व संस्थेसंबंधी पुरेशी माहिती असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विषयाला व कार्यक्रमाला सोडून बोलणे होते व स्वत:चे हसे होते.

भाषेचा वापर- निवेदकाने आपल्या भाषेचा वापर श्रोतृवर्ग कसा आहे हे ओळखून निवेदन करायला हवे. उदा. लहान मुलांचा कार्यक्रम आहे की प्रौढ व्यक्तींचा आहे? श्रोत्यांचा सामाजिक स्तर व बौद्धिक पातळी कशी आहे? इत्यादी बाबींचा विचार करून आपल्या शब्दांचा व भाषाशैलीचा वापर करायला हवा. निवेदकाला चांगल्या शब्दांचा व भाषेचा उपयोग निवेदनात करायचा असेल तर त्यासाठी भरपूर वाचन हवे. शब्दांचा सखोल अभ्यास करायला हवा. चांगला बोलू शकणारा व अचूक टायमिंग ठेवूून शब्दांची फेक करणारा निवेदक प्रेक्षकांच्या उस्फूर्त टाळीने दाद मिळवू शकतो.

वाक्याच्या लयीच्या हुकमतीवर निवेदकाने लक्ष द्यायला हवे. सर्व कार्यक्रम फुलांच्या हारासारखा गुंफणे, कार्यक्रमात रंगत आणणे, श्रोत्यांची आस्वादकाची भूमिका तयार करणे यावरच कार्यक्रमाचे यश-अपयश अवलंबून असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे भान ठेवून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय चांगल्या शब्दांत मांडणाऱ्या व्यक्तीस उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून ओळखले जाते.
सत्कार व बक्षीस समारंभ- क्रीडास्पर्धा अथवा शालेय स्पर्धाच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे निवेदन बहुधा सरळ भाषेत केले जाते, कारण त्यांचे निकाल अगोदरच प्रेक्षकांना कळलेले असतात.

परंतु सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रांत विशेष कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव अथवा सत्कार करण्यात येतो. त्याचप्रमाणे चित्रनाटय़ स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतात. अशा वेळी निवेदकाने थोडीशी उत्सुकता वाढविण्याचे कौशल्य वापरल्यास निवेदन अधिक आकर्षक होते. पहिल्याच ओळीत सत्कारमूर्तीचे नाव सांगण्यापेक्षा त्याच्या कार्याचा आढावा घेत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवून नंतर मध्येच अथवा शेवटी (प्रसंगानुरूप) नाव जाहीर केले तर निवेदनाची रंगत वाढते. अर्थात त्याचे निवेदन पचपचीत आमटीसारखे न वाटता झणझणीत कोल्हापुरी भाजीसारखे करण्याची कला अवगत असायला हवी. तरच श्रोत्यांची उत्स्फूर्तपणे दाद सत्कारमूर्तीला आणि निवेदकालाही मिळते.

काय टाळावे- काही व्यक्तींना जडलेल्या सवयी ते व्यासपीठावर असतानासुद्धा दिसतात. उदा. सतत हात चोळत निवेदन करणे, केसांवर सारखा हात फिरवणे, डोके खाजवणे, निवेदन करीत असताना  मधेच मोबाइलवर बोलणे हे कटाक्षाने टाळायला हवे. सूत्रसंचालकाने देहबोलीचा (इ८ि छंल्लॠ४ंॠी) व्यवस्थित उपयोग करून व्यासपीठावर हालचाल करणे आवश्यक आहे. अवास्तव हाताच्या व मानेच्या हालचाली व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहचवितात.

तात्पर्य चारचौघात बडबड करणारी व्यक्ती चांगला सूत्रसंचालक असतोच असे नाही. अभ्यासपूर्वक सराव केला, भरपूर वाचन करून शब्द व ज्ञानभांडार वाढविले तरच यशस्वी सूत्रसंचालक म्हणून या क्षेत्रात करिअर करता येईल.


सुत्रसंचालन कसे करावे | सूत्रसंचालन कसे करावे | कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कसे करावे | Sutrasanchalan Kase Karave   | सूत्रसंचालन कसे करावे मराठी | पाहुण्यांचा परिचय चारोळी | चांगले सूत्रसंचालन कसे करावे   | सुत्रसंचालन चारोळ्या | पाहुण्यांचा परिचय चारोळ्या | Sutrasanchalan Kase Karave In Marathi | सूत्रसंचालन कसे करायचे | पाहुण्यांचा परिचय कसा करावा   | मराठी सूत्रसंचालन | Ase Karave Sutrasanchalan | Sutrasanchalan Kaise Karave | Sutrasanchalan Kashi Karavi | मराठी सुत्रसंचालन | Sutrasanchalan Marathi | मराठी सूत्रसंचालन लिहिलेले   | Marathi Sutrasanchalan | 

1 comment: