वायग्राबद्दल माहिती घ्यायची असेल तर त्याआधी पुरुषाच्या शिस्नाला ताठरता कशी येते हे
समजून घ्यावं लागेल. पुरूषाच्या शिस्नामध्ये हाडं किंवा स्नायू नसतात. शिस्नामध्ये स्पंजसारख्या
पोकळ्या असतात ज्याला इंग्रजीमध्ये 'कॉपोर्रा कॅवर्नोजा' असं म्हणतात. या पोकळ्यांमध्ये
जेव्हा रक्त भरलं जातं तेव्हा पुरुषाचं शिस्न ताठ होतं. या पोकळ्यांमध्ये रक्त भरण्यासाठी
मात्र त्यातील रक्तवाहिन्या शिथिल असाव्या लागतात.
ज्यांच शिस्न 'स्वत:हून' ताठ होतं पण केवळ समाधानपूर्वक इण्टरकोर्स (समागम) होईपर्यंत
ताठ राहू शकत नाही केवळ त्यांच्यासाठी वायग्राचा उपयोग होतो. 'शिस्नातली ताठरता
अधिक काळ टिकवणं' केवळ एवढंच काम वायग्रा करतं. शिस्नामध्ये ताठरता 'आणण्याच्या'
क्रियेत वायग्राचा काहीही उपयोग नसतो. ज्या पुरुषांमध्ये शिस्नात ताठरता न 'येण्याची'
तक्रार असते त्यांनी वायग्रा घेऊनही त्याचा काही उपयोग होत नाही.
रक्तवाहिन्या शिथिल होताच त्यामध्ये रक्त भरलं लागतं आणि शिस्न फुगून इरेक्ट (ताठर) होऊ
लागतं. कॉपोर्रा कॅवर्नोजामधल्या या रक्तवाहिन्या शिथिल होण्यासाठी त्यामध्ये 'नायट्रिक
ऑक्साइड' हे दव्य पाझरलं जातं. नायट्रिक ऑक्साइडच्या प्रभावामुळेच रक्तवाहिन्या शिथिल
होऊन त्यामध्ये रक्त भरलं जाऊ लागतं आणि शिस्न ताठ होतं. नायट्रिक ऑक्साइडचा परिणाम
कमी करण्यासाठी मग पीडीई-५ नावाचा एन्झाइम (वितंचक) कार्यरत होतो आणि शिस्न पुन्हा
सैल पडू लागतं. हा पीडीई-५ एन्झाइम जर सप्रेस केला तर मग नायट्रिक ऑक्साइडचा परिणाम
अधिक काळ टिकून राहू शकतो आणि शिस्न अधिक काळासाठी इरेक्ट (ताठ) राहू शकतं. हेच काम
वायग्रा करतं.
लैंगिक इच्छा वाढवणं, नपुंसक व्यक्तीमध्ये शिस्नाला ताठरता आणून, शुक्रजंतूंचं प्रमाण वाढवणं या
गोष्टीवर वायग्राचा काहीही परिणाम होत नाही.
वायग्रामधल्या औषधी घटकाचं नाव 'सिलडेनॅफिल साइट्रेट' असं आहे. वायग्राच्या गोळ्या २५,
५० व १०० मिलिग्रॅमच्या मात्रेमध्ये बनवल्या जातात. वायग्रा घेण्याआधी व्यक्तीची पूर्ण
वैद्यकीय तपासणी करणं अत्यंत जरुरी असतं. केवळ तक्रार ऐकून वायग्रा घेण्याचा सल्ला देणं
घातक ठरू शकतं. ज्या व्यक्तींमध्ये वायग्रा घेण्याचा सल्ला दिला जातो त्या व्यक्तीला
इण्टरकोर्सपूर्वी एक तास वायग्राची गोळी घ्यावी लागते. वायग्राचा परिणाम साधारणपणे
चार तास टिकतो. त्यानंतर लगेच दुसरी गोळी घेण्याची परवानगी नसते. चोवीस तासात फक्त
एकदाच वायग्राचा वापर करता येऊ शकतो.
वायग्रा घेणाऱ्या व्यक्तीमध्ये पचनदोष निर्माण होऊ शकतात. मुत्रपिंड आणि यकृत यांचे विकार
असतील तर वायग्रा घेणं धोकादायक ठरू शकतं. तसंच ६५ वर्षांवरील पुरुषांनीही वायग्राचा
वापर न केलेलाच बरा. वायग्राच्या सेवनामुळे लिंगातली ताठरता काही तास टिकून
राहिल्यामुळे काही जणांना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि त्याचा उपाय म्हणून केलेल्या
सर्जरीमुळे कायमचं नपुंसकत्व आलं असल्याची नोंद केली गेली आहे. या प्रकाराला 'प्रायपिझम'
असं म्हणतात. म्हणूनच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:हून वायग्रा घेऊ नये.
वायग्राच्या दुष्परिणामांची आता थोडी माहिती घेऊ या. वायग्रा शिस्नामधल्या ज्या
पीडीई-५ या एन्झाइमचा विरोध करतं. त्याच प्रकारचे एन्झाइम डोळे आणि हृदयातही असतात.
यामुळेच वायग्राचे डोळ्यांवर आणि हृदयावर दुष्परिणाम दिसून येतात. सिमेटिडिन आणि
एरिथ्रोमाइसीन या नेहमी वापरल्या जाणाऱ्या औषधांबरोबर जर वायग्रा घेतलं गेलं तर
वायग्राची रक्तातली पातळी धोकादायक होण्याइतकी वाढू शकते. तसंच अतिरक्तदाब आणि
हृदयरोगाच्या रुग्णांना नेहमी देण्यात येणाऱ्या 'नाइट्राइटस' या प्रकारच्या औषधाबरोबर
वायग्रा घेण्यात आलं तर ते प्राणघातक ठरू शकतं.
No comments:
Post a Comment