Monday, July 25, 2016

सूत्र संचालन कसे करावे | सुत्रसंचालन चारोळ्या | प्रभावी भाषण कसे करावे |मराठी सुत्रसंचालन | कार्यक्रमाचे सूत्रसंचालन | सूत्रसंचालन चारोळ्या | सूत्रसंचालन नमुना | सत्कार समारंभ | मराठी सूत्रसंचालन

सूत्र संचालन कसे करावे | सुत्रसंचालन चारोळ्या  | प्रभावी भाषण कसे करावे  |मराठी सुत्रसंचालन  | कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  | सूत्रसंचालन चारोळ्या | सूत्रसंचालन नमुना  | सत्कार समारंभ  | मराठी सूत्रसंचालन


Related image


सूत्र संचालन कसे करावे
 सूत्रसंचालकाचे काही गुण :-

  • भाषाप्रभुत्व
  • नीटनेटकेपणा
  • संवेदनशिलता
  • सभाधीटपणा
  • हजरजबाबीपणा
  • सौजन्यशिलता
  • सुक्ष्मावलोकन क्षमता
  • आंगिक हुशारी
  • चाणाक्षपणा |
  • इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
  • भावनिक सक्षमता
〰〰〰〰〰〰
 कार्यक्रम पत्रिका:-
उदा. व्याख्यान 

आगतम् स्वागतम् सुस्वागतम्

1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण
2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार
3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.
4) स्वागतगीत
5) प्रास्ताविक
6) पाहुण्यांचा परिचय
7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी
8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.
9) अध्यक्षीय समारोप
10) आभार
11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी
〰〰〰〰〰〰〰
Image result for सूत्रसंचालन

 सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-

1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण?  याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे
इत्यादी

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नमुना | सुत्रसंचालन म्हणजे काय? | सुत्रसंचालनाची गरज...


सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...
सूत्रसंचलनाचे काही प्रकार...
& कवि सूत्रसंचालक
& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
& औपचारिक कार्यक्रम
& शास्त्रीय संगीताची मैफिल
& गाण्यांचा कार्यक्रम
& राजकीय कार्यक्रम
& नैमित्तिक कार्यक्रम
& शासकीय कार्यक्रम
& सांस्कृतिक कार्यक्रम
& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
इत्यादी..

निवेदन कलेतील प्रभावी चेहरा
निवेदन कलेतील प्रभावी चेहरा

मराठीतील एकही कलाकार, साहित्यिक, राजकारणी नसेल; ज्यांच्याबरोबर गाडगीळांनी सुसंवाद साधलेला नाही. नावांची व कार्यक्रम, प्रयोगांची जंत्री मोठी, हजारांमध्ये आणि त्या कलावंतांनासुद्धा गाडगीळांविषयी आत्मीयता वाटणं, यातच त्यांचं यश आहे. एकदा कार्यक्रम त्यांच्याकडं सोपवला, की तो पूर्ण तयारीनिशी व उत्तमच होणार, याची आयोजकांना खात्रीच असते, त्यामुळं तेही निर्धास्त! गाडगीळांच्या ‘बाप्पाच्या’ कृपेनं, कार्यक्रम ठरवताना ‘साहेबांची’ तारीख नक्की झाल्यावर गाडगीळांना नक्की करूनच थिएटर शोधलं जायचं!

‘चैत्रबन’ आणि ‘दूरदर्शन’चं फार मोठं ऋण त्यांच्यावर आहे. सुधीर गाडगीळ घराघरांत पोचण्यासाठी दूरदर्शन या प्रभावी माध्यमाचा आणि त्यांना संधी देणाऱ्या अरुण काकतकर, विनय आपटे, विजया जोगळेकर अशा दिग्गज निर्मात्यांचा मोठा वाटा आहे. गाडगीळांची मुशाफिरी फक्त पत्रकारितेत, निवेदन, मुलाखतीत थांबली नाही; तर आकाशवाणी, दूरदर्शनवर बातम्या देऊन, अनेक वर्तमानपत्रांत आपल्या फिरस्तीवर, खवय्येगिरीवर, भेटलेल्या विक्षिप्त माणसांवर स्तंभ व नंतर पुस्तकंही लिहिली. काही चित्रपट, मालिकांमध्ये अभिनयही केला! रोजनिशी न चुकता लिहिणाऱ्या गाडगीळांना उत्तम स्केचेस काढायचीही सवय आहे. आतमध्ये कुठंतरी कार्टूनिस्ट मनही आहे. जवळच्या मित्रांना मात्र कायम वाटत राहिलं, आजही वाटतं, की सुधीरनं लेखनाकडं लक्ष केंद्रित करावं. याचं कारण त्यांची स्वतःची वेगळीच निरीक्षणं, स्मरणशक्ती व शैली आहे. त्यांचा पाच दशकांचा अनुभव लेखनात उतरला पाहिजे. पण, ऐकतील ते गाडगीळ कसले? ते त्यांच्याच धुंदीत जगतात! हवं तसं! तंत्रज्ञानाचंही त्यांना असंच वावडं! त्यामुळं इंटरनेट, सोशल मीडिया, ई-मेल वगैरेपासून ते कित्येक मैल लांब असतात. त्यामुळं आपलं नुकसान झालेलं त्यांना चालतं. पण, फरक काहीच पडत नाही! अक्षर तर मोत्यांसारखं सुंदर!

माझ्यासारख्या साठच्या दशकात जन्माला आलेल्या आणि पुढं माध्यमांमध्ये मुशाफिरी केलेल्यांवर सुधीर मोघे आणि नंतर सुधीर गाडगीळांचा प्रभाव होता. शब्दांची जाण, रंगमंचावरचा वावर, संशोधन, उच्चार, आवाजातील चढउतार, सहजता, या दोघांकडून निरीक्षणानं शिकता आली. अनेक निवेदक सूत्रसंचालकांना, माध्यमकर्मींना या दोन सुधीरांनी माध्यमांचं, मंचाचं, सादरीकरणाचं आत्मभान आणि आत्मविश्‍वास दिला. संधी नि प्रोत्साहन दिलं. गाडगीळ हा अवलिया पाऊणशे वेळा परदेशात गेला, हजारो कार्यक्रम केले. पण, आजही पूर्ण तयारी केल्याखेरीज, आपल्या जुन्या पोतडीतील माहिती काढून अभ्यास केल्याखेरीज ते स्टेजवर पाऊल ठेवत नाहीत.

सूत्रसंचालकाचे काही गुण:-

1) हजरजबाबीपणा
2) वाचन व्यासंग
3) संग्रहन
4) वाक्पटुत्व
5) बहुश्रुतता
6) भाषाशैली

 सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी

* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी

 सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-

  • # हे करू नका
  • # ते करा
  • संयोजकाशी समन्वय :-
  • संयोजनातील नियोजन
  • परिसंवाद-वादविवाद नियोजन
  • कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
  • माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
  • मुलाखतीचे संचालन
  • कार्यक्रम पत्रिका
  • मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते
  • सूत्रसंचालन ही एक कला
  • सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे
  • सूत्रसंचालन -एक करिअर
  • निवेदकाची चलती
  • पाहुण्यांचा परिचय
  • सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
  • वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
  • उपयुक्त संत अवतरणे
  • पंत अवतरणे
  • कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
  • काही बहुचर्चीत कविता
  • आईच्या कविता
  • स्त्री जीवनविषयक ओव्या
  • उखाणे
  • इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...


सूत्रसंचालन क्षेत्रात स्थिरावण्यासाठी कुठली कौशल्ये आत्मसात करावी लागतात, तसेच या क्षेत्रातील विविध संधींबाबतचे मार्गदर्शन-

सूत्रसंचालन नमुना pdf download

हल्ली मुंबई व अनेक प्रमुख शहरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठय़ा प्रमाणात केले जाते. सामाजिक व राजकीय सभा, वर्धापनदिन, बक्षीस समारंभ, साहित्य सम्मेलने, नाटय़ व काव्यसम्मेलने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठय़ा प्रमाणात केले जाते.

सूत्रसंचालन चारोळ्या | सत्कार समारंभ चारोळ्या

इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी असते ती व्यासपीठप्रमुखाची. ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडता आली नाही तर संपूर्ण कार्यक्रमाचा विचका होतो आणि आयोजकाचे हसू होते. अशा मोठय़ा कार्यक्रमामध्ये व्यासपीठ प्रमुखाने आयोजकांशी चर्चा करून सर्व गोष्टींचे प्लॅिनग (नियोजन) करणे आवश्यक असते. सूत्रबद्ध व चांगल्या पद्धतीने कोणताही कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी व्यासपीठ प्रमुखाची असते.

व्यासपीठावरील आसन व्यवस्था, टेबले, दीपप्रज्वलन यांची योग्य ठिकाणी मांडणी करायला हवी. पोडियमची जागा, टेबले, माईकची व्यवस्था, पाण्याच्या बाटल्या, लिहायचे पॅड, पेन, कार्यक्रमपत्रिका इत्यादी गोष्टींची मांडणी अभ्यासपूर्वक व योग्यरत्या करणे आवश्यक असते. स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, हारतुरे, शाली, ट्रे या वस्तू कोणत्या दिशेस ठेवाव्यात याचे ज्ञान असणे आवश्यक असते. 

त्याचप्रमाणे हारतुरे, पुष्पगुच्छ घेऊन जाणाऱ्या मुलींना/ महिलांना आगाऊ योग्य सूचना देणे आवश्यक असते. अन्यथा अशा मुलींचा कार्यक्रमाच्या वेळी गोंधळ होतो.

सूत्रसंचालन नमुना मराठी

कार्यक्रमाचे आयोजन करीत असताना डेकोरेटरची माणसे कोण आहेत, साऊंड व्यवस्था कोण सांभाळतो, ईश:स्तवन, अथवा पसायदान कोण गाणार आहे, फोटोग्राफर कोण आहे या सर्वाची नावे व मोबाइल नंबर ठाऊक असणे आवश्यक असते. कारण कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर बसलेले असतात. 

अशा वेळी एखादा घोटाळा अथवा अचानक एखाद्याची गरज भासल्यास व्यासपीठावर बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन कानात कुजबुज करावी लागते आणि हे दिसणं योग्य वाटत नाही. कित्येक वेळा अशा व्यक्तींना आयत्या वेळी शोधण्यासाठी वेळ फुकट जातो.

सूत्रसंचालन मान्यवरांचे स्वागत  चारोळ्या pdf | 

कवितांच्या दुनियेत किती मजा असते
एकटं एकटं वाटताना अख्खी दुनिया सोबत असते.
  ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄            

 देवाला हात जोडून
 स्वस्थ बसायच नसत
 देव घडवीत नाही
 आपण घडायच असतं
  ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄            

 काही अबोलक्या भावना
  शब्दांच्या कुशीत मोजतात
  कधी हसण्यात फुलतात
  तर कधी आसवात भिजतात
  ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄            

 जीत हासिल करनी हॆ
   तो काबिलीयत बढाई
   किस्मत की रोटी तो
    कुत्ते को भी नसून नही होती
  ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄            

 खेल तसा का हो या जिंदगी का
  अपना उल्का तब ही सिखाना
   जब सामने बादशहा हो
  ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄             
 जिनके इरादे नेक होते हॆ
   उनके  दोस्त अनेक होते हॆ
  ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄            

 कोर्या कोर्या कागदावर
   असलं जरी छापलं
 ओठावर आल्याखेरीज
    गाणं नसतं आपलं
  ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄            

स्टेज इनचार्ज व सूत्रसंचालक या दोघांचा ताळमेळ असणे आवश्यक  असते म्हणून कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी संपूर्ण कार्यक्रमाच्या आखणीची दोघांनीही माहिती करून घेणे आवश्यक असते. ते न झाल्यामुळे एका कार्यक्रमात असाच एकदा गोंधळ उडाला होता. त्या कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेल्या अनेक सत्कारमूर्तीचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्याचा कार्यक्रम चालू होता.

स्नेहसंमेलन सूत्रसंचालन pdf

 त्या स्मृतिचिन्हांवर सत्कारमूर्तीची नावे लिहिली होती. परंतु ही गोष्ट सूत्रसंचालकास ठाऊक नव्हती. काही अडचणीमुळे सूत्रसंचालकाने नावे घेण्याचा क्रम बदलला त्यामुळे स्मृतिचिन्ह घेऊन जाणाऱ्या मुली व्यासपीठावर अध्र्याहून मागे फिरत होत्या. कारण ते स्मृतिचिन्ह त्या व्यक्तीचे नसायचे. 

सूत्रसंचालन चारोळ्या हिंदी

हा गोंधळ कशामुळे होतोय हे निवेदकाला कळत नव्हते. प्रेक्षकांचा गैरसमज झाला की सूत्रसंचालक चुका करतोय, परंतु प्रत्यक्षात तसे नव्हते. कोणताही कार्यक्रम शिस्तबद्ध व यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी व्यासपीठ प्रमुखावर असते त्यासाठी आयोजकांनी कार्यक्रमापूर्वी व्यासपीठ प्रमुखाशी चर्चा करणे आवश्यक असते. तसेच त्यांच्या सूचनाही विचारात घेणे आवश्यक असते.

सूत्रसंचालन नमुना

सूत्रसंचालन हा इव्हेंटचाच महत्त्वपूर्ण भाग आहे आणि या क्षेत्रात करिअर करणाऱ्या तरुणांना भविष्यात खूप मोठा वाव आहे. या क्षेत्राचे महत्त्व अधिकाधिक वाढत जाणार आहे. आजही काही मंडळी या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवून आहेत. 

सुधीर गाडगीळ, अशोक रानडे, प्राध्यापक शंकर वैद्य, प्राध्यापक राम शेवाळकर, भाऊ मराठे, मंगला खाडिलकर, सुरेश खरे,  या मंडळींनी निवेदन या क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे. स्वत:चा व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे काही मंडळी वळत आहेत. तर काही जण छंद म्हणून जोपासत आहेत.

सूत्रसंचालकाचे स्थान- सूत्रसंचालक हा व्यासपीठावरच असावा. त्याला आपल्या नजरेतून शेवटच्या श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचण्याची कला अवगत असावी. काही आयोजक सूत्रसंचालकाला व्यासपीठाच्या खाली बसवितात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. कारण अशा वेळी सूत्रसंचालकाला संपूर्ण कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे जड जाते आणि मग कार्यक्रमापेक्षा श्रोत्यांच्या गप्पांना अधिक रंग चढतो.

सूत्रसंचालन कसे करावे

सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमात मुख्य सूत्रसंचालक एकच असतो. काही वेळेला साहाय्यकांना निवेदन करण्याची थोडीशी जबाबदारी सोपविली जाते. उदा. पाहुण्यांचा परिचय, सत्कार समारंभ, आभारप्रदर्शन इत्यादी. परंतु काही संस्था मुख्य सूत्रसंचालकाची जबाबदारी दोन किंवा तीन व्यक्तींकडे सोपवितात आणि मग या निवेदकांमध्ये बोलण्याची व माईक स्वत:समोर खेचण्याची स्पर्धा सुरू होते.

सूत्रसंचालन परिपाठ मराठी

निवेदकाचे स्थान कोणत्या दिशेला असावे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. ज्या बाजूला सत्कार समारंभाचे सामान ठेवलेले असेल अथवा कार्यक्रमाशी निगडित वस्तू ठेवलेल्या असतील त्या दिशेला असावे. कारण काही गोंधळ झाल्यास अडचण भासल्यास त्वरित निवेदकाला इशारा करता येतो अथवा सूचना देता येतात.

सूत्रसंचालन शायरी
सूत्रसंचालकाची जबाबदारी कोणावर सोपवावी हेसुद्धा महत्त्वाचे आहे. ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे, कमावलेल्या खणखणीत आवाजाची देणगी ज्याला लाभली आहे, ज्याला या विषयाचा अभ्यास आणि सराव आहे, अशाच व्यक्तीकडे जबाबदारी सोपवावी. कारण सूत्रसंचालक हा व्यासपीठावरील कार्यक्रम व श्रोते यांच्यातला महत्त्वाचा दुवा असतो, परंतु कित्येक वेळेला मी पदाधिकारी आहे म्हणून अथवा माझ्या विभागात माझाच हा मान अशा अटी घालणाऱ्या व्यक्ती काही वेळेला चांगल्या कार्यक्रमाचा विचका करतात.

गॅदरिंग सूत्रसंचालन

आवश्यक अभ्यासात्मक गोष्टी- निवेदकाचा आवाज स्पष्ट व चांगला असावा. घोगरा नसावा. श्वासावर पूर्ण नियंत्रण असावे. श्वासोच्छवासाचा आवाज माईकवर जाणार नाही याची दक्षता घ्यावी. जेवढा लांब श्वास रोखून धरता येतो तेवढा आवाजाचा दर्जा चांगला. याकरिता आवाजाचा (व्हॉईस कल्चर) अभ्यास केल्यास अधिक उत्तम. 

परिपाठ सूत्रसंचालन | सत्कार समारंभ सूत्रसंचालन

एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन करायचे असेल तर किमान चार दिवस आधी जिभेचे, घशाचे व पोटाच्या स्नायूंचे विविध व्यायाम करायला हवेत. जेणेकरून स्पष्ट शब्दोच्चार व चांगल्या आवाजाला हा सराव उपयोगी पडतो. गायकाला जसा गाण्याआधी रियाज करावा लागतो तसाच निवेदकाला आवाजाचा (घशाचा) सराव करणे आवश्यक आहे.

विनोदी सूत्रसंचालन

आवाजाच्या विकासाकरिता शास्त्रोक्त अभ्यास सर्वप्रथम इटालियन प्राध्यापक ‘स्क्विझी’ यांनी केला. त्यानंतर आपल्या येथे बी. आर. देवधर हे शास्त्र शिकून आले व त्यांच्यामार्फत हा अभ्यास डॉ. अशोक रानडे व निर्मला गोगटे यांनी केला व हळूहळू या अभ्यासाचे महत्त्व सर्वाना कळू लागले.

सूत्रसंचालन in english

निवेदकाने स्पष्ट शब्दोच्चार व स्पष्टपणे बोलणे आवश्यक आहे. अवास्तव मोठय़ाने बोलणे केव्हाही वाईट, तसेच तोंडातल्या तोंडात बोलणे चुकीचे. योग्य पट्टीतून बोलण्याचा अभ्यास असावा. तसाच कार्यक्रमाच्या प्रसंगानुरूप व भाषेनुसार चढ-उतार करणे व लय ठेवणे आवश्यक आहे. कुठल्या शब्दांवर जोर द्यायचा अथवा द्यायचा नाही, पॉझ घेणे याचा कार्यक्रमापूर्वी संहितेचे वाचन करून सराव करणे आवश्यक आहे. 

सूत्रसंचालन karnyasathi मान्यवरांसाठी शायरी

आत्मविश्वासाने आणि ताणविरहित निवेदन  करता येणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील हावभाव हेही तितकेच महत्त्वाचे. मख्ख चेहऱ्याने बोलणाऱ्याचे निवेदन श्रोत्यांच्या कानापर्यंत पोहचते पण मनापर्यंत पोहोचत नाही. जो कार्यक्रम सादर करणार आहोत, त्या कार्यक्रमासंबंधी व संस्थेसंबंधी पुरेशी माहिती असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विषयाला व कार्यक्रमाला सोडून बोलणे होते व स्वत:चे हसे होते.

भाषेचा वापर- निवेदकाने आपल्या भाषेचा वापर श्रोतृवर्ग कसा आहे हे ओळखून निवेदन करायला हवे. उदा. लहान मुलांचा कार्यक्रम आहे की प्रौढ व्यक्तींचा आहे? श्रोत्यांचा सामाजिक स्तर व बौद्धिक पातळी कशी आहे? इत्यादी बाबींचा विचार करून आपल्या शब्दांचा व भाषाशैलीचा वापर करायला हवा. निवेदकाला चांगल्या शब्दांचा व भाषेचा उपयोग निवेदनात करायचा असेल तर त्यासाठी भरपूर वाचन हवे. 

शब्दांचा सखोल अभ्यास करायला हवा. चांगला बोलू शकणारा व अचूक टायमिंग ठेवूून शब्दांची फेक करणारा निवेदक प्रेक्षकांच्या उस्फूर्त टाळीने दाद मिळवू शकतो. वाक्याच्या लयीच्या हुकमतीवर निवेदकाने लक्ष द्यायला हवे. सर्व कार्यक्रम फुलांच्या हारासारखा गुंफणे, कार्यक्रमात रंगत आणणे, श्रोत्यांची आस्वादकाची भूमिका तयार करणे यावरच कार्यक्रमाचे यश-अपयश अवलंबून असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचे भान ठेवून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय चांगल्या शब्दांत मांडणाऱ्या व्यक्तीस उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून ओळखले जाते.

सूत्रसंचालन कार्यक्रम पत्रिका

सत्कार व बक्षीस समारंभ- क्रीडास्पर्धा अथवा शालेय स्पर्धाच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचे निवेदन बहुधा सरळ भाषेत केले जाते, कारण त्यांचे निकाल अगोदरच प्रेक्षकांना कळलेले असतात. परंतु सामाजिक, राजकीय, औद्योगिक क्षेत्रांत विशेष कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव अथवा सत्कार करण्यात येतो. त्याचप्रमाणे चित्रनाटय़ स्पर्धेत विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतात. 

अशा वेळी निवेदकाने थोडीशी उत्सुकता वाढविण्याचे कौशल्य वापरल्यास निवेदन अधिक आकर्षक होते. पहिल्याच ओळीत सत्कारमूर्तीचे नाव सांगण्यापेक्षा त्याच्या कार्याचा आढावा घेत प्रेक्षकांची उत्सुकता वाढवून नंतर मध्येच अथवा शेवटी (प्रसंगानुरूप) नाव जाहीर केले तर निवेदनाची रंगत वाढते. अर्थात त्याचे निवेदन पचपचीत आमटीसारखे न वाटता झणझणीत कोल्हापुरी भाजीसारखे करण्याची कला अवगत असायला हवी. तरच श्रोत्यांची उत्स्फूर्तपणे दाद सत्कारमूर्तीला आणि निवेदकालाही मिळते.

सूत्रसंचालन चारोळ्या
काय टाळावे- काही व्यक्तींना जडलेल्या सवयी ते व्यासपीठावर असतानासुद्धा दिसतात. उदा. सतत हात चोळत निवेदन करणे, केसांवर सारखा हात फिरवणे, डोके खाजवणे, निवेदन करीत असताना  मधेच मोबाइलवर बोलणे हे कटाक्षाने टाळायला हवे. सूत्रसंचालकाने देहबोलीचा व्यवस्थित उपयोग करून व्यासपीठावर हालचाल करणे आवश्यक आहे. अवास्तव हाताच्या व मानेच्या हालचाली व्यक्तिमत्त्वाला धक्का पोहचवितात.

तात्पर्य चारचौघात बडबड करणारी व्यक्ती चांगला सूत्रसंचालक असतोच असे नाही. अभ्यासपूर्वक सराव केला, भरपूर वाचन करून शब्द व ज्ञानभांडार वाढविले तरच यशस्वी सूत्रसंचालक म्हणून या क्षेत्रात करिअर करता येईल.



मार्गदर्शन


तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र -----
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

आभार

कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

व्संतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

क्रीडास्पर्धेत मशाल प्रज्ज्वलित करतांना---*

*🎤1)सा-या जगतात विराजमान*
*असे क्रीडाक्षेत्र करुया विशाल*
*आरंभ करुनी जागवुया चेतना*
*पेटवुनी तेजोमय ही क्रीडामशाल*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*🎤2)ज्ञानाची पराजुन तलवार*
*सोबत घ्या क्रीडेची ढाल*
*जाऊ साता समुद्रापार*
*सन्मानाने पेटवु क्रीडामशाल*
 ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*🎯बाल आनंद मेळावा सूत्रसंचालनासाठी--*


*🖊बांधुनी तोरण आनंदाचे*
*हा दिन असा साजरा व्हावा*
*बालकांचा जीव इथे रुळावा*
*तयांना आनंद आनंद मिळावा*

*🖊वैविध्य साधत खाद्य पदार्थांनी*
*तृप्ततेचा ढेकर इथे मिळावा*
*पंख लावुनी या आनंदाला*
*भरवू बालकांचा आनंद मेळावा*

*🖊गंमत जंमत करुनी सारे*
*हसतील नाचतील इथे बालक*
*दौलत राष्ट्राची ही रक्षिण्या*
*होवुया आपण सुज्ञ पालक*

*🖊नाचुया खेळुया बागडुया इथे*
*चित्रातही रंग भरुया इथे*
*धमाल मजा करुया इथे*
*नको ती भीती नको ते दडपण*
*फुलाप्रमाणे डोलुया,फुलुया इथे*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄ 

 "शाळा नसते केवळ खडू आणि फळा                                                    
शाळा म्हणजे असते विद्यार्थ्यांचा लळा                                            
 जिथे ह्रदये फुलतात, मने बहरतात                                                     
ती शाळा म्हणजे संस्कृतीचा मळा                                                                 
वेगवेगळ्या कलागुणांचा जमला आहे मेळा                                               
तो पाहण्यासाठी आपण झालो आहोत गोळा                                           
हा तर खरा बालआनंद मेळा ,बालआनंद मेळा "   
  ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄            
                               
🌹🌹 *परिपाठ सूत्रसंचालन*🌹🌹

"ढगातील  पावसाची पडते,
     धरणीशी गाठ.
अशा या सुंदर समयी,
सादर करत आहोत आम्ही परिपाठ" 

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

 "जीवन आहे खरी कसोटी
  मागे वळून पाहू नका.
   येईल तारावयास कोणी
   वाट कुणाची पाहू नका..
  यश तुमच्याजवळ आहे.
जिंकल्याशिवाय राहू नका..

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

आयुष्य म्हणजे पुढं पुढं चालत राहणं आहे,
कुठलंही यश म्हणजे शेवटचा टप्पा नाही,
अन् अपयश म्हणजे प्रवासाची अखेर नाही!

शून्यावर बाद होणं म्हणजे सारं काही संपणं नव्हे!
तर
पुढच्या डावातील शतकाचीच
ती जणू पायाभरणी होय!

माणसाचं आयुष्य म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ!
शतक म्हणजे जणू यश!
शून्य म्हणजे जणू अपयश !!

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

: 🌹दिपप्रज्वलन करताना🌹

🎤 " ज्ञान विज्ञान कलेची
         इथे जाहली मांदियाळी
         कुलदिपक लावितो
         विद्धेची ही नित्य दिवाळी  "
🎤  " खूप काही बोलणार होतो
          बोलता मात्र येणार नाही
          शारदेच्या पूजनाच्या वेळी
          बुद्धी माझी तोलणार नाही "

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

 पोरीची पसंती आली की
बापाचं काळीज धडधडतं
चिमणी घरटं सोडणार म्हणून
आतल्या आत खूप रडतं

हसरे खेळकर बाबा एकदम
धीर गंभीर दिसू लागतात
पोरीला पाणी मागण्या पेक्षा
स्वतःच उठून घेऊ लागतात

या घरातला चिवचीवाट आता
कायमसाठी थांबणार असतो
म्हणून बाप लेक झोपल्यावर
तिच्याकडे पाहून रडत असतो

अंबुच्या लिंबूच्या करत करत
मोठी कधी झाली कळलं नाही
बाप सांगतो तिलासोडून
मला पाणीही गिळलं नाही

दिवसातून एकदा तरी
मायेनं जवळ घ्यावं वाटतं
परक्याचं धन असलं तरी
द्यायला मात्र नको वाटतं

उठल्या पासून झोपे पर्यंत
बाबाची काळजी घेत असते
आज ना उद्या जाणार म्हणून
पोरगी जास्तच लाडाची असते

पोरगी जाणार म्हणलंकी
बाप आतून तुटून जातो
कळत नाही बैठकीतून
अचानक का उठून जातो ?

इकडे तिकडे जाऊन बाबा
गुपचूप डोळे पुसत असतात
लेकीचं कल्याण झालं म्हणून
पुन्हा बैठकीत हसत असतात

तिचा सगळा जीवनपट
क्षणाक्षणाला आठवत राहतो
डोळ्यात येणाऱ्या आसवांना
बाबा वापस पाठवत राहतो

बी. पी. ची गोळी घेतली का ?
आता कोण विचारील गं ?
जास्त गोड खाऊनका म्हणून
कोण कशाला दटवील गं ?

बाबा कुणाचं ऐकत नाहित पण
पोरीला नकार देत नाहीत
तिने रागात पाहिलं की मग
ताटात गुलाबजाम घेत नाहीत

एका अर्थानं पोरगी म्हणजे
काळजी करणारी आईच असते
पोटचा गोळा देणाऱ्याची
कहाणी फार वेगळी असते

तळपता सूर्य तो महान
त्याची सावित्री ही ठरली ज्योती
विद्यादानाचे व्रत घेउनी
हाती
सावित्रीबाई बनल्या क्रांती ज्योती

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

: नव्या युगाची मी नवमहिला
गायीन नविन गाणी
मी न दासी मी न देवता
जगेन माणुस म्हणुनी जगेन माणुस म्हणुनी
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
 ओढ असते स्वप्नाची
ओढ आपल्या माणसाची
जगावस वाटत घेउन सोबत दोन शब्दांची
त्याच दोन शब्दासह हे शुभेच्छा पत्र खास आपल्यासाठी 🌹
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄


नवे वर्ष. ....

       नव्या उमेदिचे,
        नव्या उभारीचे
         जुने सगळे विसरून ,
         पुन्हा नव्या आशेचे....

नवे वर्ष. ...
   आनंदाचे,
    कडू भूतकाळ विसरण्याचे,
    चांगल्या आठवणी सोबत घेऊन,
    नवीन उंबरठा ओलांडण्याचे .

नवे वर्ष....
        तुझे माझे गीत गाण्याचे,
        पुन्हा सर्व ऋतू अनुभवन्याचे.
        रुसणे फुगणे मागे ठेऊन,
        फक्त प्रेम सोबत नेण्याचे. .

नवे वर्ष. .....
          सुखदुःखाचे क्षण,
          एकत्र जगण्याचे.
          नव्याने नाती जोडण्याचे,
           सोबत आहे ते जपण्याचे. ..


नवे वर्ष. .....
           कल्पकतेने सजवायचे ,
            प्रेमाने ते रचायचे.
            सोबतीने उभारायचे,
            ओलाव्याने सावरायचे. .

नवे वर्ष. .....
            अनुभवाच्या खाणीतून,
             स्वतःला सिद्ध करायचे.
             नवीन संकल्प करून,
              ते पूर्ण करण्याचे. ..
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*मेरी धडकनो में धडकता रहे तु ,
मेरे देश तुझको नमन है मेरा,
जीऊं तो जुबां पर तेरा नाम हो
मरूं तो तिरंगा कफन हो मेरा।.*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
: *कभी सनम को छोड़ के देख लेना,
कभी शहीदों को याद करके देख लेना,
कोई महबूब नहीं है वतन जैसा यारो,
मेरी तरह देश से कभी इश्क करके देख लेना.. **
*वंदे मातरम*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*वतन हमारा ऐसा कोई छोड़ ना पाये ,*
*रिश्ता हमारा कोई तोड़ ना पाये ,*
*दिल एक है हमारा और एक जान है ,
हिंदुस्तान हमारा है हम इसकी शान है ..*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
: *दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है .
सिर हमेशा ऊँचा रखना इसका जब तक दिल में जान हैं ..*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
*कुछ नशा तिरंगे की आन का है ,*
*कुछ नशा मातृभूमि की शान का है ,*
*हम लहरायेंगे हर जगह ये तिरंगा ,
नशा ये हिन्दुस्तां के सम्मान का है ..*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
: *जब आँख खुले तो धरती हिन्दुस्तान की हो:*
*जब आँख बंद हो तो यादेँ हिन्दुस्तान की हो:*
*हम मर भी जाए तो कोई गम नही लेकिन;*
*मरते वक्त मिट्टी हिन्दुस्तान की हो।*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
: *अगर मैं जन्म लू दुबारा इंसान में*
*भगवन देना मिट्टी हिन्दुस्तान की*
*होंठो पे गंगा हो हाथो में तिरंगा हो"*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

चला तर मग टाळ्या मिळवण्यासाठी बनवूया चारोळी,-----*

*धारेशिवाय किंमत नाही*
*तलवारीच्या पातीला*
*पाण्याशिवाय किंमत नाही*
*धरणाच्या मातीला*
*सुगंधाशिवाय किंमत नाही*
*फुलांच्या जातीला*
*रसिक माय-बाप हो,*
*तुमच्या टाळ्यां शिवाय किंमत नाही*
*आमच्या कार्यक्रमाच्या साथीला*......
 ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

सुत्रसंचालन कसे करावे

☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
आईच्या आईपणाला 
तिच्यातील बाईपणाला 
तिने सोसलेल्या नऊ महिन्याच्या कळांना 
त्यासाठी मिळालेल्या हत्तीच्या बळांना 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
बायको नावाच्या अर्धांगिनीला 
तिच्यात दडलेल्या कारभारणीला 
संसारातील तिच्याबरोबरच्या प्रत्येक क्षणाला 
दोन घर जोडणाऱ्या तिच्या विशेष मनाला 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
सख्या , चुलत , मावस  बहिणीला 
बहिणी सारख्या प्रिय वहिनीला 
त्यांनी बांधलेल्या प्रत्येक राखीला 
माहेरी झालेल्या त्यांच्या वजाबाकीला 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
मावशी आणि आत्याला 
त्यांनी जपलेल्या जुन्या नात्याला 
मामी आणि तिच्या खट्याळ पोरीला 
शाळा कॉलेजातील प्रत्येक दिलचोरीला 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
आज्जीच्या संस्कार सृष्टीला  
तिने पेरलेल्या अनुभवी दूरदृष्टीला  
घरच्या आणि शेजारच्या काकूला 
सुख दुःखात त्यांनी दिलेल्या टेकूला 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
मनभूमी ते कणभूमी गाजवणाऱ्या 
विश्वातील प्रत्येक क्षेत्रात डंका वाजवणाऱ्या 
भूत , वर्तमान , भविष्यकाळी  रणरागिनींना 
तुमच्या आमच्या सर्वांच्या माता भगिनींना 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
हार्दिक शुभेच्छा🙏हार्दिक हार्दिक🙏शुभेच्छा.... 
 ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

नका करू गर्भपात स्त्रीभ्रूण हत्येचा
आनंदाने जगू द्या हक्क द्या जगण्याला।।

खुलण्या आधीच नका तोडू |बहरु द्या जीवनाला 
सुंदर रंग दुनियेचे  
रंग भरू द्या स्वप्नांना।।

नाहीस अबला दाखव धाडस 
जिंकून साऱ्या दुनियेला 
अन्यायाचा नाश करोनी 
दिशा दाखव जगण्याला।।

दोन्ही घराला संस्कार देणारी 
संस्काराची पणती तू 
आत्मनिर्भय संरक्षणाची 
मशाल आता पेटव तू।।

सुखदुःखाची सावली जन्मभर साथ असते 
क्षणभराची पत्नी अनंतकाळची माता असते 
कितीही वार होतील जीवनावर 
संरक्षण करणारी तू ढाल असते।।
 ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
आई म्हणून 
बहीण म्हणून 
मैत्रीण म्हणून 
बायको म्हणून 
मुलगी म्हणून
तिच्या कर्तव्यात कधीही कमी पडत नाही 
तिला हवी असते फक्त तुमची साथ 
त्या प्रत्येक स्त्री ला सलाम
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄
अपने वो नही होते जो  
*तस्वीर*  में साथ खड़े होते हैं,
अपने वो हैं जो 
*तकलीफ*   में साथ खड़े होते हैं .... 
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

 मेरी खामोशियों में भी फसाना ढूंढ लेती है.. 
बड़ी शातिर है ये दुनिया बहाना ढूंढ लेती है.. 
हकीकत जिद किए बैठी है चकनाचूर करने को.. 
मगर हर आंख फिर सपना सुहाना ढूंढ लेती है.. 
न चिडि़या की कमाई है न कारोबार है कोई.. 
वो केवल हौसले से आबोदाना ढूंढ लेती है.. 
समझ पाई न दुनिया मस्लहत मंसूर की अब तक.. 
जो सूली पर भी हंसना मुस्कुराना ढूंढ लेती है.. 
उठाती है जो खतरा हर कदम पर डूब जाने का.. 
वही कोशिश समन्दर में खजाना ढूंढ लेती है..
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

सूत्र संचालन कसे करावे | सुत्रसंचालन चारोळ्या 

  ☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.

प्रभावी भाषण कसे करावे

अतिथींच्या आगमनाने
गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण

 मराठी सुत्रसंचालन 


जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 


पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते!
चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते !  
म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे        
म्हणजे भाग्यच असते ! तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो



हीच प्रार्थना !

सूत्रसंचालन चारोळ्या 


संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची

सूत्रसंचालन नमुना 

सत्कार समारंभ 

मराठी सूत्रसंचालन




गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.

सूत्रसंचालन चारोळ्या




प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान

सूत्रसंचालन कसे करावे


जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून

सुत्रसंचालन चारोळ्या
मराठी सुत्रसंचालन

मार्गदर्शन

तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्ततुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहेजीवणाचे संपूर्ण शास्त्र —–

ज्ञानरूपी मार्गाच्यापदक्रमातून कळस गाढू प्रगतीचात्यासाठी मान आहेअध्यक्षीय मार्गदशनाचा

बोलके करण्यास हवे असते संभाषणआधारासाठी हवे असते आश्वासनयोग्य दिशा मिळण्यासाठीआवश्यक आहे मार्गदर्शन

आभार प्रदर्शन मराठी

आभार प्रदर्शन कविता

कार्यक्रम झाला बहारदार

भाशणही झाले जोरदार

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार


प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली

आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली

आपल्या मार्गदशर्नाने

आम्हाला दिशा मिळाली

शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.


थेंबाथेंबाने तलाव भरतो

हाताहाताने कार्यक्रम फुलतो

जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार

तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.


वसंतात येतो फुलांना बहार

तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार

श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार

तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार

sutrasanchalan script in marathi
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन


सत्कार समारंभ चारोळ्या  | Bakshish Vitaran Sutrasanchalan  | Sutrasanchalan Script In Marathi  | सत्कार समारंभ सूत्रसंचालन  | सुत्रसंचालन चारोळ्या  | Marathi Sutrasanchalan Script  | Sutrasanchalan Marathi Charolya  | Sutrasanchalan In Marathi Script  | सूत्र संचालन चारोळ्या  | सत्कार समारंभ भाषण मराठी  | Satkar Samarambh Charolya  | सूत्रसंचालन चारोळ्या मराठी  | Satkar Samarambh Marathi Charolya  | सूत्रसंचालन चारोळ्या  | Marathi Sutrasanchalan Charolya  | सूत्रसंचालन नमुना  | Aabhar Pradarshan Marathi Charolya  | मान्यवरांचे स्वागत चारोळ्या  | आभार प्रदर्शन चारोळ्या मराठी  | आभार प्रदर्शनासाठी कविता, चारोळी:  | 6 December Sutrasanchalan  | सूत्रसंचालन नमुना मराठी  | मराठी सूत्रसंचालन चारोळ्या  | Sutrasanchalan In Marathi Charolya  | आभार प्रदर्शन कविता मराठी  | Swagat Samarambh Charolya  | प्रभावी भाषण कसे करावे  | आभार प्रदर्शन चारोळ्या  | कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कसे करावे

Thursday, July 21, 2016

बामुलाहिजा सोता राहुल | राहुल को कोई सीरियसली ले रहा है


Thursday, July 14, 2016

बामुलाहिजा उधर स्कोप ज्यादा है | मोदीजी का मिशन 356




Posted: 14 Jul 2016 09:00 PM PDT
bjp cartoon, lal krishna advani cartoon, bjp cartoon, sheila dixit cartoon, up election cartoon, cartoons on politics, indian political cartoon

Posted: 14 Jul 2016 07:24 AM PDT
amit shah, bjp cartoon, article 356, cartoons on politics, indian political cartoon


 

बामुलाहिजा केजरीवाल बताएँगे क्या है 'ठुल्लू'


बामुलाहिजा

Link to Cartoon, Hindi Cartoon, Indian Cartoon, Cartoon on Indian Politcs: BAMULAHIJA

Posted: 13 Jul 2016 07:40 AM PDT
arvind kejriwal cartoon, AAP party cartoon, aam aadmi party cartoon, cartoons on politics, indian political cartoon, bbc cartoon

Wednesday, July 13, 2016

बामुलाहिजा ज़ाकिर नाईक को चाहिए नई किताब


बामुलाहिजा

Link to Cartoon, Hindi Cartoon, Indian Cartoon, Cartoon on Indian Politcs: BAMULAHIJA

Posted: 12 Jul 2016 07:06 AM PDT
cartoon, hindi cartoon, bbc cartoon, cartoons on politics, indian political cartoon, Media cartoon, zakir naik

Posted: 12 Jul 2016 07:04 AM PDT
cartoon, hindi cartoon, bbc cartoon, cartoons on politics, indian political cartoon, Media cartoon, narendra modi cartoon

Posted: 12 Jul 2016 07:02 AM PDT
cartoon, hindi cartoon, bbc cartoon, cartoons on politics, indian political cartoon, narendra modi cartoon, bjp cartoon, Media cartoon

Posted: 12 Jul 2016 06:59 AM PDT
cartoon, hindi cartoon, bbc cartoon, cartoons on politics, indian political cartoon, isis, Terrorism Cartoon, subramnyam swami cartoon, bjp cartoon

Posted: 12 Jul 2016 06:57 AM PDT
cartoon, hindi cartoon, bbc cartoon, cartoons on politics, indian political cartoon, isis, Terrorism Cartoon

Posted: 12 Jul 2016 06:56 AM PDT
cartoon, hindi cartoon, bbc cartoon, cartoons on politics, indian political cartoon, narendra modi cartoon, bjp cartoon, digital india

Posted: 12 Jul 2016 06:54 AM PDT
cartoon, hindi cartoon, bbc cartoon, cartoons on politics, indian political cartoon